सोलापूरात मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिळाल्या ढाब्यावर

सोलापूर : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी निवडणूक पार पडली. ७ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात एका ढाब्यावर ३ ईव्हीएम मशीन आढळून आल्याने खळबळ उडाली. हा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनीही तीन ईव्हीएम मशीन आढळून आल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे. या मशीन मतदानासाठी वापरल्या गेलेल्या नाहीत असे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. मोहोळ शहराजवळ असलेल्या एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी हा प्रकार समोर आणला. स्वराज्य बार अँड हॉटेल परिसरात संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेश पाटील कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले होते. मोहोळमधील या प्रकारावर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, मशीन ढाब्यावर आढळणे हा प्रकार दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणी आम्ही संबंधितांवर कारवाई करणार आहोत. आढळून आलेल्या ईव्हीएम मशीन अतिरिक्त होत्या. त्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नाहीत असा खुलासा त्यांनी केला. झोनल अधिका-यांकडे अतिरिक्त दोन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, वाहन चालक आणि अधिकारी यांच्यात संवाद न झाल्याने हा प्रकार घडला असावा. त्या मशीन स्ट्राँग रुममध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

आयोगाची सत्ताधारी पक्षाला मदत : अंबादास दानवे
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की ईव्हीएम मशीन नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन नेमण्यात आलेले असते. ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडले आता काय कारणे देणार? ईव्हीएम बद्दल वारंवार शंका उपस्थित होत आहे. यात निवडणूक आयोग काही तरी करून सत्ताधारी पक्षाला मदत करत असतो असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|पाणीपुरी खाल्ली आणि १६ जण रुग्णालयात; कंधार हादरला!
01:15
Video thumbnail
Latur|मान्सूनपूर्व कामांचा दावा हवेत; पहिल्याच पावसात लातूर जलमय
02:33
Video thumbnail
Latur Manapa|लातूर मनपा ठप्प! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका
01:58
Video thumbnail
Udgir Farmer Andolan|हातात नांगर, सरकारविरोधात एल्गार; उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा सत्याग्रह!
03:10
Video thumbnail
Latur|रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात हरंगुळ येथील नागरिक आक्रमक;बांधकाम विभागासमोर अर्धनग्न आंदोलन
02:29
Video thumbnail
Latur Manpa Andolan|दोन महिन्यांपासून पगार नाही; मनपा कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
04:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये 'नाते शतजन्माचे'; परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद!
03:08
Video thumbnail
Latur|TET पेपरफुटीवर उदगीरमध्ये अभाविपचा एल्गार; सरकारविरोधात जोरदार आंदोलन!
02:30
Video thumbnail
अयोध्या राम मंदिर प्रकरणात दोषींना सोडलं जाणार नाही - केंद्रीय मंत्री चिराग पासवान
01:31
Video thumbnail
Udhav Thakre sabha|परभणीत उद्धव ठाकरेंचा एल्गार; बंडखोरांवर थेट हल्लाबोल!
05:46
Video thumbnail
Hingoli|कृषिमंत्र्याच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
00:57
Video thumbnail
Sanjay Jadhav On Sanjay Raut|"हम तो इतने बेशरम हैं..." म्हणत जाधवांचा राऊतांवर निशाणा
04:28
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01

Latest news