18.9 C
Latur
Sunday, November 17, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणुकीचे बनावट वेळापत्रक व्हायरल

निवडणुकीचे बनावट वेळापत्रक व्हायरल

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बनावट निवडणूक वेळापत्रकावर भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. ईसीआयने शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सांगितले की निवडणुकीचे वेळापत्रक मजकूर आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे नव्हे तर पत्रकार परिषदांद्वारे जाहीर केले जाते.

वास्तविक, सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सांगितले की, व्हायरल झालेले पत्र बनावट आहे. ईसीआयने वर लिहिले आहेी की लोकसभा इलेक्शन २०२४ च्या वेळापत्रकाबाबत व्हॉटस् अ‍ॅपवर एक बनावट संदेश शेअर केला जात आहे. दरम्यान ईसीआयने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

ईसीआयने सांगितले की, निवडणूक वेळापत्रक आयोगाने पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करते. आयोगाने सदर मॅसेजची शहानिशा करा हा हॅशटॅग लिहिला आणि लोकांना संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की लोकसभा निवडणूक १९ एप्रिल रोजी आहे. या बनावट पत्रात लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आहे. त्यात म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ मार्च आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २२ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हे पत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाले.

१६ एप्रिल गती देण्यासाठी
वास्तविक, महिनाभरापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयातून एक अंतर्गत नोट प्रसारित करण्यात आली होती. ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. नोटमध्ये १६ एप्रिल ही संभाव्य मतदानाची तारीख लक्षात घेऊन निवडणुकीच्या तयारीला गती देण्यास सांगितले आहे. मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, ही तारीख केवळ तयारीला गती देण्यासाठी संदर्भात नमूद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR