24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रतोडफोड प्रकरणी संभाजीनगरात पहिला गुन्हा दाखल

तोडफोड प्रकरणी संभाजीनगरात पहिला गुन्हा दाखल

छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून राज्यभरात हिंसक आंदोलने होत असून, मराठवाड्यातील अनेक भागात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली होती. आता या प्रकरणी तोडफोड करणा-या आरोपींविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३०पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. याचे लोण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पसरले आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणात तोडफोड करणा-या आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी ३० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ते १२ आंदोलकांची ओळख पटली असून, इतर अज्ञात लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

पोलिसांकडून शांततेचे आवाहन
मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनाचे पडसाद आता विभागातील अनेक जिल्ह्यांत देखील पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिस देखील अलर्ट झाले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच प्रत्येक आंदोलनावर पोलिसांचे लक्ष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR