40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रएमडी गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक

एमडी गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक

नाशिक : गेल्या महिन्यामध्ये आडगाव हद्दीमध्ये एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जप्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती. परंतु दुसरा संशयित पसार होता, त्यास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने बळीमंदिर परिसरातून अटक केली.

राहुल नारायण शिंदे(रा. हनुमान नगर, अमृतधाम, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या १४ फेब्रुवारी रोजी आडगाव परिसरातून संशयित धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल (रा. राजवाडा, ंिदडोरीरोड) यास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली असता त्याच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचे ५.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले होते. मात्र त्याचा साथीदार राहुल शिंदे पसार झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल होता.

दरम्यान, युनिट एकचे अंमलदार नितीन जगताप यांना संशयित राहुल शिंदे बळी मंदिर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार ठाकरे, परदेशी, पानवळ, राठोड, जगताप, शेख, पालखेडे यांच्या पथकाने सापला रचून त्यास अटक केली आहे. त्यास तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तडीपार गुंडाला अटक
युनिट एकचे अंमलदार राजेश राठोड यांना तडीपार गुंड रोहित पवार (रा. शुभम अपार्टमेंट, शांतीनगर, म्हसरुळ) हा तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शांतीनगर परिसरात आल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, हवालदार धनंजय शिंदे, देवीदास ठाकरे, मिलिंद परदेशी, पानवळ, राठोड, जगताप, शेख, बर्डे यांच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR