32.1 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeसोलापूरसोनसाखळी चोराला पकडले,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

सोनसाखळी चोराला पकडले,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : रात्रीच्या वेळी एकटाच दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या वृद्धाला गाठून त्याची सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मार्केट यार्डजवळील गाळ्यात गाठून त्याला जेरबंद केले. विनोद विठ्ठल भोसले (वय २७, रा. सग्गमनगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

अ‍ॅटलॉन्स अपेक्समध्ये राहणारे रमेश संगणबसय्या नंदीमठ हे त्यांचा मित्र चन्नप्पा कुरे याला भेटून माणिक चौकमार्गे घराकडे दचाकीवरून निघाले होते. सराईत चोरट्यानं त्यांना शिंदे चौकातील काळी मशिदजवळील रोडवर गाठून गळ्याला हिसका मारून १७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून पोबारा केला, या गुन्ह्याच्या आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. सपोनि दादासो मोरे यांच्या पथकाला संबंधित चोरटा सोन्याची चेन विकण्यासाठी मार्केट यार्ड येथील गाळा नं. २५६ येथे विनानंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून येणार असल्याची टीप मिळाली. लागलीच पथकाकडून सापळा लावण्यात आला.

नमूद वर्णनाचा चेन स्नॅचर विनोद आढळला त्याला शिताफीनं ताब्यात घेऊन विश्वासात घेतले. त्याने सदरची चेन चोरल्याची कबुली देऊन पोलिसांच्या हवाली केली. त्यानुसार १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गन्हा उघडकीस आणण्यात आला.अनोळखी व्यक्त्ती पत्ता विचारण्याच्या निमित्ताने जवळ आला तरी त्याच्याशी बोलणे टाळावे. कदाचित त्यामध्ये एखादा चेन स्नॅचरही असू शकतो. खातरजमा करावी. मौल्यवान वस्तूंना जपावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे” वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR