36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीउमरी शाळेने परभणी तालुक्यात पटकावला पहिला क्रमांक

उमरी शाळेने परभणी तालुक्यात पटकावला पहिला क्रमांक

परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र राज्यात १ जानेवारी ते १५ जानेवारी कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात शालेय रंगरंगोटी, वर्ग सजावट, परसबाग, शालेय पोषण आहारात विद्यार्थी व पालक सहभाग, तंबाखुमुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, महावाचन चळवळ, स्वच्छता मॉनिटर म्हणून विद्यार्थी सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती व पालक, माजी विद्यार्थी यांचा विद्यार्थी उपक्रमात सहभाग इत्यादी उपक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी ता. परभणी या शाळेने दैदीप्यमान कामगिरी केली व तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश शिंदे, गटविकास अधिकारी जयंत गाढे, गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले, गावचे सरपंच जगन्नाथ गोरे, उपसरपंच प्रकाश गोरे, ग्रामपंचायत सदस्य माणिक गोरे, अशोक गोरे, प्रसाद गोरे, नारायण गोरे, बालासाहेब कांबळे, सिध्दार्थ कांबळे, रघुनाथ माने, शेख गणी, अशोक मस्के, ग्रामविस्तार अधिकारी हनुमान कच्छवे यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नारायण भोसले, शरद लोहट, अनंत कुलकर्णी, शिवाजी गोजरटे, रघुनाथ क-हाळे, धुराजी मगरे,ज्योती गांगुर्डे, अर्चना आरळकर, अर्चना भारस्वाडकर, उषा सोमावार, विजया हाडे, जयश्री मोधे या सर्व शिक्षकवृंदांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठलराव गोरे, गजानन गोरे, संजय गोरे, ज्ञानोबा गोरे, शामराव गोरे, जगन्नाथ गोरे, मुंजाभाऊ गोरे, रामनारायण गोरे, बळीराम लबडे, अरुणा कांबळे, धनुमामा गोरे, सुमनबाई गोरे आदींनी सहकार्य केले. या यशाबद्दल गावकरी मंडळीकडून शाळेचे कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR