31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रसोन्याच्या दरात पुन्हा उसळी

सोन्याच्या दरात पुन्हा उसळी

जळगाव : प्रतिनिधी
आखाती देशात इराण-अमेरिकेने जाहीर केलेल्या शस्त्रसंधीमुळे आंतरराष्ट्रीय बाजार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर शनिवारी दीड लाखाच्या घरात पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४९० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो २,६०,००० रुपयांवर पोहोचली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४९० रुपयांनी वाढल्याने भाव १,५२,८४० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४०,१०० रुपयांवर पोहोचला आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,१४,६३० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह देशभरातील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सराफा बाजारात सलग दोन दिवस सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले. ऐन लग्नसराईत सोन्याचा दर वाढल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांना जादा दर मोजावा लागणार आहे.

तत्पूर्वी, इराण-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांतील वाद मिटल्यास त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. युद्धकाळात सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. त्यामुळे युद्ध सुरू राहिल्यास सोन्याचे दर १ लाख ८० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR