नाशिकमध्ये अपघातानंतर पिकअपने पेट घेतला; चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
सिन्नरमध्ये भीषण अपघातामध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर पिकअपने पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमावरून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यात पंचाळेजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर पिकअपने पेट घेतला.

या अपघातामध्ये बाहेर फेकल्या गेलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांना पिकअपमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री या अपघाताची माहिती मिळताच सिन्नरच्या रुग्णवाहिका, सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री मदतकार्य केले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघे जण सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावातील रहिवासी होते. मृतांवर शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले.

मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. पिकअप चालक किरण रवींद्र मोरे (२५ वर्षे), शुभम गणेश नवले (२२ वर्षे), रिंकू शुभम नवले (१९ वर्षे), मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (३५ वर्षे) अशी मृतांची नावं समोर आली आहेत. सचिन गणेश नवले, सुनीता गणेश नवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news