29 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरशासनाच्या निर्णयाचे सोलापुरातील बांधकाम क्षेत्राकडून स्वागत

शासनाच्या निर्णयाचे सोलापुरातील बांधकाम क्षेत्राकडून स्वागत

सोलापूर : राज्य शासनाने रेडी रेकनर दर पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे बांधकाम क्षेत्राकडून स्वागत केले गेले आहे.

राज्य शासनाने पुढील कालावधीसाठी रेडी रेकनर दर कायम ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशामुळे बाजारात घर खरेदी व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही. हे दर कमी व्हावेत ही घर खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्व सामान्यांची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झालेली नाही. पण वाढ न होता दर स्थिर राहिल्याने बाजारपेठेची स्थिरता कायम राहण्यास मदतच होणार आहे असे मानले जाते.

जिल्ह्यात संपत्या आर्थिक वर्षात जमीन खरेदी विक्रीतून ५०० कोटीची मुद्रांक शुल्क वसुली देखील झाली आहे.दरम्यान, रेडी रेकनर दराच्या बाबत शासनाचे आदेश प्राप्त झाल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी सांगितले. जिल्ह्यात संपत्या आर्थिक वर्षात ४०० कोटी मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण करत पाचशे कोटीची मुद्रांक शुल्क वसुली झाली आहे. या वर्षात एकूण १ लाख १५ हजार ९१७ दस्त नोंदवले गेले. जे की मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहेत.

राज्य सरकारने रेडी रेकनर दर जाहीर केला. तो पूर्वीप्रमाणे कायम ठेवला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राचे व्यवहार स्थिर राहण्यास मदत होणार आहे. रेडी रेकनर दर कमी व्हावेत ही अपेक्षा असते. पण तसे न होता पूर्वीचा दर कायम आहे. त्यामुळे खरेदीदारांना सध्याचे त्यांचे व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही. बांधकाम क्षेत्राचे मार्केट पूर्वी प्रमाणे ठाम राहील असा विश्वास वाटतो. असे बांधकाम व्यवसायीक दत्तात्रय मुळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR