25.9 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तान सीमेवर ‘जीपीएस’ स्पूफिंग; वैमानिकात संभ्रम!

पाकिस्तान सीमेवर ‘जीपीएस’ स्पूफिंग; वैमानिकात संभ्रम!

सीमेजवळ विमान उड्डाण करणे धोकादायक; ४६५ वेळा विविध विमानांच्या जीपीएसमध्ये हस्तक्षेप

नागपूर : प्रतिनिधी
अहमदाबाद येथे लंडनला जाणा-या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर देशातील नागरी उड्डयन क्षेत्राबाबत विविध चर्चांना उधाण झाले आहे. सर्वसाधारणत: देशाअंतर्गत उड्डाणांना हवेत तांत्रिक बिघाडांशिवाय दुसरा फारसा धोका नसतो. मात्र, २०२३ सालापासून सीमेजवळ विमानांचे उड्डाण करणे धोकादायक झाले आहे.

हवेत असलेल्या विमानांच्या जीपीएस किंवा जीएनएसएसमध्ये (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम) हस्तक्षेप करण्याचे (जीपीएस स्पूफिंग) शेकडो वेळा प्रयत्न झाले असल्याची बाब समोर आली आहे. नोव्हेंबर २०२३ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत ४६५ वेळा विविध विमानांच्या जीपीएसमध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विमानांच्या जीपीएस प्रणालीत हस्तक्षेप झाल्याच्या अनेक तक्रारी विविध एअरलाइन्सकडून ‘डीजीसीए’कडे करण्यात आल्या. विशेषत: अमृतसर व आजूबाजूच्या भागात हे प्रकार जास्त झाले आहेत. याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यावर डीजीसीएकडून नोटीस टू एअरमन जारी करण्यात येते. २०२३ साली इराकमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न दिसून आले होते. त्यानंतर विविध देशांतील एअरलाइन्सला या समस्येचा सामना करावा लागतो आहे.

जीपीएस ‘स्पूफिंग’ नेमके काय?
जीपीएस स्पूफिंगमध्ये जाणूनबुजून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) द्वारे प्रसारित होणा-या सिग्नलमध्ये फेरफार करण्यात येतात. जीपीएस/जीएनएसएस जॅमिंगचा उद्देश जीपीएस रिसीव्हर्सना खोटी स्थाने किंवा वेळ दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा असतो. या स्पूफिंगमुळे पायलट्सला चुकीचा डेटा मिळतो. त्यामुळे नेव्हिगेशनल सिस्टम, डिव्हाइस आणि उपग्रह-आधारित प्रणालीला फटका बसू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR