22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याणच्या बाजारात गुजरातच्या पणत्या

कल्याणच्या बाजारात गुजरातच्या पणत्या

मुंबई : दिव्यांचा सण दिवाळी हा अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशीपासून घरोघरी पणत्यांमध्ये दिवे लावले जातात. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पणत्यांची दुकाने थाटलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवाळी सणाला पणत्यांना मोठी मागणी असली तरी पारंपरिक पणत्या, टिवल्या बनविण्यासाठी लागणा-या कल्याणमधील भट्ट्या काळाच्या पडद्याआड गडप झाल्याने विक्रेत्यांनाच नव्हे तर कुंभारांना देखील या पणत्या गुजरातमधून विकत घ्याव्या लागत आहेत.

बाजारात उपलब्ध असलेल्या पणत्या या थेट गुजरातमधून आणल्या जात असून, या पणत्या ३ रुपये प्रति नग या दराने खरेदी कराव्या लागत आहेत. मात्र ५ रुपयांनासुद्धा या पणत्या कोणी ग्राहक घेण्यास धजावत नसल्याने विक्रेत्यांसह कुंभारवाड्यातील कुंभारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

पणत्या, मडकी यासारख्या मातीच्या वस्तू काळ्या मातीपासून बनवून त्या भट्टीत भाजून तयार कराव्या लगतात. मात्र विकासाच्या गराड्यात भट्ट्या गायब होत होत नामशेष झाल्या आहेत. भट्ट्या पेटविण्यासाठी जागा राहिलेली नसून, मोकळ्या जागेवर भट्टी पेटवल्यास त्यातून निघणा-या धुरामुळे प्रदूषण होत असल्याने या भट्ट्या बंद कराव्या लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याणात भगवा तलावाजवळ असलेली भट्टी आजही सुरू असली तरी या भट्टीत तयार होणा-या पणत्या मागणीप्रमाणे पुरेशा नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी गुजरातमधून पणत्यांची आयात करावी लागत असल्याचे विक्रेत्यानी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR