तो फेकी गोलंदाजी करतो; काव्या मारनने पांड्यावर केले गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, या लढतीनंतर बंगळुरूचा अष्टपैलू गोलंदाज कृणाल पांड्या याच्यावर सनरायझर्सची मालकीण काव्या मारन हिने काही गंभीर आरोप केले आहेत. काल झालेल्या लढतीत तुफानी फटकेबाजी करणा-या सनरायझर्सच्या फलंदाजांना रोखण्यासाठी कृणाल पांड्याने गोलंदाजीतील सर्व प्रकारचे हातखंडे आजमावले होते. मात्र फलंदाजांना रोखण्यासाठी वैविध्यपूर्ण शैलीत गोलंदाजी करणा-या कृणाल पांड्याच्या गोलंदाजी शैलीवर काव्या मारन हिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, तो फेकी गोलंदाजी करत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

सामन्यादरम्यान, कृणाल पांड्या याने नितीश कुमार रेड्डीविरोधात एक वेगवान चेंडू टाकला. तेव्हा काव्या मारन हिने फेकी गोलंदाजीचा इशारा केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये काव्या मारन ही कृणाल पांड्या फेकी गोलंदाजी करत असल्याचा आरोप करताना दिसत आहे. दरम्यान, आता काव्या मारनच्या आक्षेपानंतर बीसीसीआय कृणाल पांड्यावर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हैदराबादचा आक्रमक फलंदाज हेन्रिक क्लासेन खेळपट्टीवर असताना कृणाल पांड्या याला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी क्लासेनने पांड्याला षटकार ठोकला. मात्र या षटकात पांड्याने केवळ आठ धावा दिल्या. त्यानंतर १७ व्या षटकात गोलंदाजीसाठी आल्यावर कृणाल पांड्याने दुस-या चेंडूवर क्लासेनची विकेट काढली. मात्र याच षटकात नितीश कुमार रेड्डीने पांड्याच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकले. त्यानंतर या षटकातील शेवटच्या चेंडूवर काव्या मारन हिने कृणाल पांड्या याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news