24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नीला औषधातून ब्लेडचे तुकडे खायला देत केला खूनाचा प्रयत्न

पत्नीला औषधातून ब्लेडचे तुकडे खायला देत केला खूनाचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (वय ४५) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ऑक्टोबर पासून सुरू होता. गेल्या २ महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये अनेक वाद विवाद सुरू होते. सोमनाथ हा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते. सोमनाथने अनेकदा पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केली होती.

काही दिवसांपूर्वी सोमनाथ आणि त्याचा भाऊ घरी दारू प्यायला बसले होते. यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचे ठरवले होते, असे पोलिसांनी म्हटले.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या. यात आधी ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. तसेच ते जबरदस्तीने गिळायला लावले, असा आरोप महिलेने केला होता. फिर्यादीच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR