समृद्धी महामार्गावर थरार! ३ चिमुकल्यांना गाडीत झोपवून पत्नीला संपवले

वाशिम : प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हद्दीतील समृद्धी महामार्गावर एका थरारक आणि तितक्याच अंगावर काटा आणणा-या क्रूरतेचा शेवट झाला. कलवर्धा (गौतमबुद्ध नगर, उत्तर प्रदेश) येथून निघालेली एक कार ग्रेटर नोएडाच्या दिशेने वेगात धावत होती; पण या प्रवासाचा शेवट इतका भयानक असेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. संशयाच्या सैतानी भुताने पछाडलेल्या पतीने समृद्धी महामार्गावरील कारंजा (लाड) परिसरात गाडी थांबवून आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह घेऊन स्वत: कारंजा शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

उत्तर प्रदेशातील कलवर्धा येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय सलमान खान नेक मोहम्मद खान हा आपली २८ वर्षांची पत्नी हसीनबानो आणि तीन निष्पाप लहान मुलांसह कारने फिरायला जाऊया सांगून निघाला होता. आपले कुटुंब घेऊन समृद्धी महामार्गावरून जात असताना त्याच्या मनात मात्र संशयाचे आणि क्रूरतेचे भयानक मनसुबे शिजत होते.

गाडी समृद्धी महामार्गावरून कारंजा परिसराजवळ पोहोचली असता, मध्यरात्रीच्या सुमारास त्याने कार बाजूला घेतली. शांत आणि निर्मनुष्य ठिकाणी अचानक वाद सुरू झाला. तोवर कारमधील लहान मुले गाढ झोपेत असावीत. संशयाच्या अतिरेकातून सलमानने गाडीत ठेवलेला लोखंडी रॉड काढला आणि मागचा-पुढचा कोणताही विचार न करता हसीनबानोच्या डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा जीव जात नाही हे पाहून त्याने तिचा गळा आवळला आणि तिचा श्वास कायमचा थांबवला.

हत्या केल्यानंतर कोणत्याही सामान्य माणसाच्या काळजाचा ठोका चुकेल, पण सलमानच्या डोक्यावर जणू खून स्वार झाला होता. हसीनबानोचा निर्जीव मृतदेह कारमध्येच टाकून त्याने कारंजा परिसरातील रस्त्यांवर आणि महामार्गावर अनेक तास गाडी चालवली. शेजारी पत्नीचा थंड पडलेला मृतदेह, गाडीत मागे झोपलेली निष्पाप मुलं आणि स्टिअरिंगवर हात असलेला हत्यारा पती… हा सगळा थरार एखाद्या पडद्यावरील ‘क्राईम थ्रिलर’ सिनेमालाही मागे टाकणारा होता.

अनेक तास शहरात आणि महामार्गावर गाडी गोल-गोल फिरवल्यानंतर, अखेर पहाटेच्या सुमारास त्याच्यातील गुन्हेगार हतबल झाला. त्याने थेट कारंजा शहर पोलिस ठाण्यासमोर गाडी थांबवली आणि पोलिसांसमोर जाऊन शरणागती पत्करली. साब ‘मैने अपनी बिवी को मार डाला है, उसकी लाश बाहर कार मे है…’ पोलिस ठाण्यात पहाटेच्या शांततेत आरोपीने उच्चारलेले हे शब्द ऐकून कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारीही हादरून गेले.

कारंजा पोलिसांनी तात्काळ गाडीची झडती घेतली असता त्यांना मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. प्राथमिक चौकशीत आरोपी सलमानने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानेच तिचा खून केल्याची कबुली दिली असली, तरी पोलिसांना या गुन्ह्यामागे संशय वाटत आहे.

पतीच्या जबाबात विसंगती
आरोपी पती पोलिस चौकशीत वारंवार आपले जबाब बदलत आहे. कधी तो एक सांगतो तर कधी दुसरीच कहाणी रचतो. कारमध्ये पती-पत्नी आणि मुलांव्यतिरिक्त आणखी एखादा तिसरा व्यक्ती सामील होता का? याचाही पोलिस कसून तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य आणि संशयास्पद बाबी लक्षात घेता कारंजा शहर पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. गाडीतून वैज्ञानिक पुरावे, रक्ताचे नमुने आणि बोटांचे ठसे गोळा करण्यात आले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50

Latest news