36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमी मराठीत बोललो, शिवीगाळ केली नाही, तक्रारीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ

मी मराठीत बोललो, शिवीगाळ केली नाही, तक्रारीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला.

या व्हीडीओत आमदार भरणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अ‍ॅग्रोचा कुणीही येणार नसल्याचे दत्ता भरणे म्हणत असल्याचे या व्हीडीओत दिसत आहे.

व्हायरल व्हीडीओबाबत दत्तात्रय भरणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की, ‘मी माझ्या मराठी भाषेत बोललो, पण मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यामुळे मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचं भांडण दिसलं. मी तिथे गेलो, त्यावेळी बारामती अ‍ॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता. त्याने माझ्या विरोधातही शब्द वापरले. मीसुद्धा माणूस आहे, मी त्याला विचारलं. व्हीडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, गावकरी त्याच्यावर धावून आले. जर मी तिथे नसतो तर अनर्थ घडला असता. गावकरी त्याच्यावर धाऊन गेले असते. पैशाचे वाटप तो करत होता. माझ्या मराठी भाषेत मी बोललो. कोणताही राजकीय हेतू नव्हता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR