33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरलातुरात १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान; सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी

लातुरात १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान; सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता मॉक पोल घेण्यात आले. लातूर शहरात सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ब-याच जणांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले. सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे ७.९१ टक्के एवढे मतदान झाले. तर १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान झाल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी सकाळी लातूर येथील ‘कृपासदन’नजीक असलेल्या केंद्रावर मतदान केले. बाभळगाव येथे आमदार अमित देशमुख यांनी मतदान केले. लातूर लोकसभा मतदारसंघात १९ लाख ७७ हजार ४२ मतदार आहेत. २ हजार २१५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. १६ हजार ७६५ कर्मचारी कार्यरत असून यात बीएलओ, चतुर्थश्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्­य कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी आदींचा समावेश आहे.

प्रत्­येक मतदार केंद्रावर पिण्­याच्­या पाण्­याची व्­यवस्­था करण्­यात आली आहे. ७८९ मतदान केंद्रांवर पेंडॉल टाकण्­यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रावर उपलब्­ध असलेल्­या खोलीत मतदारांना पंखा, पिण्­याचे पाणी, बसण्­यासाठी खुच्­र्यांची व्­यवस्­था करण्­यात आली आहे. मतदान पथक (२१२५), क्षेत्रीय अधिकारी २४२), स्थिर निगराणी पथके (२६), भरारी पथके (३४), व्­हीडीओ संनिरीक्षण पथके (२४) व राखीव पथके (३०) या पथकांसाठी एकूण जीप ७९३, बसेस ३०१ यावर जीपीएस लावण्­यात आलेली आहेत.

जिल्­हाधिकारी कार्यालयातून निगराणी करण्­यात येत आहे. मतदान केंद्राच्­या सुरक्षेसाठी ३५६७ पोलिस कर्मचारी नियुक्­त करण्­यात आले आहेत. कायदा व सुव्­यवस्­थेसाठी बीएसएफ, एसआरपी, सीआरएफपी, एसआरपीची पथके तैनात केली आहेत. १६ मतदान केंद्रं संवेदनशील असून तेथे सुरक्षेच्­या दृष्­टीने योग्­य त्या उपाययोजना करण्­यात आल्­या आहेत. शीघ्र कृति दल कार्यरत असून सीमा भागावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. १०६२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्­यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR