…अखेर गुन्हा दाखल!

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर साडे सात तास केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर, पेलेट गन गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

२० जुलै रोजी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चादरम्यान पेलेट गन गोळीबार प्रकरणी राहुल गांधींनी एफआयआर दाखल करण्याची मागणी करत शुक्रवारी दुपाारी १२च्या सुमारास ठिय्या आंदोलनास सुरूवात केली होती. पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर राहुल गांधींनी पेलेट गनने गोळीबार केल्याने जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या कुटुंबियांसह डीसीपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
काँग्रेस नेत्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी नारेबाजी सुरू केली असून यामुळे संसद मार्ग पोलिस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथे रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सलाही तैनात करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे राहुल यांनी यापूर्वी पावसाळी अधिवेशनात संसदेवरील मोर्चात पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्पष्टीकरणाचीही मागणी केली होती. मात्र, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पोलिसांकडून गोळीबार झाला नसल्याचा दावा केला होता. नीट पेपरफुटी व परीक्षांमधील अनियमितता या मुद्द्यांवरून कॉकरोच जनता पार्टीने २० जून रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. या काळात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपोषण केले. २० जुलै रोजी झालेल्या संसद चलो (संसदेकडे कूच) आंदोलनात पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर २५ जुलै रोजी हे आंदोलन समाप्त झाले.

राहुल गांधींचा निर्धार
एफआयआर दाखल न करण्याबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून सूचना मिळाल्याचा दावा पोलिस करीत असताना एफआयआर दाखल होईपर्यंत तिथून न हलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान राहुल यांच्यासोबत प्रियंका गांधी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद आणि जयराम रमेश हे देखील उपस्थित होते.

दखलपात्र गुन्ह्याची नोंद बंधनकारक : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोछाब यांनी १४ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी या प्रकरणातील तपास अधिका-याची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. लोछाब यांनी १७ ऑगस्ट रोजी ईमेल आणि फोनद्वारे पुन्हा पाठपुरावा केला. मात्र, तरीही तपास अधिका-याचा कोणताही तपशील देण्यात आला नाही, तसेच तक्रार स्वीकारल्याची पोचपावतीही देण्यात आली नाही असे गांधी म्हणाले. हा एक दखलपात्र गुन्हा असल्याने एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे, मात्र दिल्ली पोलिस तसे करत नाहीत असा आरोपही गांधी यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41
Video thumbnail
DEVANI|संघर्ष,जिद्द आणि लोकविश्वासाचा चेहरा;रामलिंग शेरे
03:25
Video thumbnail
DEVANI|16 वर्षांची आरोग्यसेवा,करुणा कर्तव्याचा आदर्श प्रवास- डॉ संतोष बिरादार
02:29
Video thumbnail
DEVANI|स्वप्नातील घरांना वास्तवाचे रूप देणारा तरुण; बांधकाम व्यावसायिक वैभव बिराजदार
01:58
Video thumbnail
AUSA|तर्कसे बंधूनी माळरानावर फुलवली ड्रॅगन शेती
02:27
Video thumbnail
DEVANI|श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा प्रेरणादायी प्रवास
02:33

Latest news