१० वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेत अत्याचार; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला अटक

नांदेड : शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत असताना संबंधित मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यावेळी मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तातडीने भाग्यनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत भाग्यनगर पोलिसांनी काल रात्री संशयित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्यावर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणा-या पोक्सो कायद्यासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील ५० वर्षीय संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, मुलीचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलिस करत आहेत. पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनेला दुजोरा देत पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांकडूनही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणातून संपूर्ण कुटुंब शहाणे करणारे अवलिया - एच.एन सय्यद
04:11
Video thumbnail
NILANGA|माळरानावर ड्रॅगन फूडची बाग;रमेश सातपुतेंची यशोगाथा
01:50
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शून्यातून विश्व निर्माण करणारे बी.आर शिंदे
04:09
Video thumbnail
NILANGA|बांधकाम व्यवसायात गरुड झेप;बिल्डर प्रकाश बोडगे
02:05
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|जिद्द मेहनतीच्या बळावर घडलेला उद्योजक प्रशांत यरमलवार
04:49
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|शिक्षणाची साथ,शेतीची वाट-पटेल बंधूंचा आदर्श
05:35
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|माणुसकीचा वारसा जपणारे गुरुनाथ शिंदाळकर
10:30
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|माणुसकी जपणाऱ्या डॉ.पूजा बिडवे -बेद्रे
04:15
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL| महिला सक्षमीकरणाच्या यशोगाथा घडविणाऱ्या अनुसया शिरूरे
04:59
Video thumbnail
SHIRUR ANANTPAL|कामातून घडलेले नगरसेवक सुधीर लखनगावे
02:06
Video thumbnail
RENAPUR|प्राचार्य अनिल कुटवाड यांची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी
03:37
Video thumbnail
RENAPUR|माळरानावर हिरवे स्वप्न फुलवणारे साहित्यिक पांडुरंग कांबळे
03:24
Video thumbnail
LATUR| किलेशन थेरपीतून विविध आजारांवर उपचार- डॉ संतोष बुरले
04:19
Video thumbnail
LATUR| महापुर ग्रामपंचातीचा ग्रामविकासात ठसा
02:22
Video thumbnail
LATUR| एक कुशल प्रशासक शिक्षणाधिकारी प्रमोद पवार
06:35

Latest news