40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयखा. सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

खा. सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत बुधवार १० जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आज झालेल्या सुनावणीत सिंह यांच्या जामीन अर्जावर कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे सिंह यांना अद्याप
कोणताही दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात आप खासदार संजय सिंह हे ऑक्टोबरपासून तिहार तुरुंगात आहेत. ईडीने ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंहला अटक केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकेविरोधात याचिका दाखल केली. २० ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने त्यांची अटक कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता, त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान आज त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देणार होते, मात्र दिल्ली न्यायालयाने सिंह यांची न्यायालयीन कोठडी १० जानेवारीपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असताना, न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR