भारत ग्राहक नव्हे, जगाचे प्रश्न सोडवणारा देश

पॅरिस : भारत आता केवळ जगातील तांत्रिक आणि आर्थिक उपायांचा ग्राहक राहिलेला नाही, तर अनेक जागतिक समस्यांवर उपाय सुचवणारा आणि त्यात योगदान देणारा देश बनला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रविवारी केले.

फ्रान्समधील भूमध्य समुद्रकिनारी असलेल्या नीस येथे आयोजित भारत इनोव्हेट्स २०२६ या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत मोदी बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतातील तरुण संशोधक आणि उद्योजक मानवजातीच्या हितासाठी उपयुक्त ठरणारे उपाय विकसित करत आहेत. दहा वर्षांपूर्वी जग भारताकडे तंत्रज्ञान स्वीकारणारा देश म्हणून पाहत होते. पण, आज भारत तंत्रज्ञान पुरविणारा देश म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत इनोव्हेट्स हा भारतासोबत जागतिक नवोन्मेषाचा पुढचा अध्याय लिहिण्यासाठी जगाला दिलेला खुले निमंत्रण आहे असे मोदी म्हणाले.

मोदींनी उच्च तंत्रज्ञान, संरक्षण, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रांमध्ये सरकारने केलेल्या सुधारणांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारताची रिफॉर्म एक्स्प्रेस थांबणार नाही; ती पुढेही वेगाने धावत राहील. भारत-फ्रान्स संबंधांवर मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्य हे केवळ राजनैतिक संबंधापुरते मर्यादित नाही; तर ते विश्वास, नवोन्मेष, प्रेरणा व सामायिक दृष्टिकोनावर आधारित आहेत.

मॅक्रॉन यांची मेक इन इंडिया उपक्रमाला दाद
आपल्या भाषणात मॅक्रॉन यांनी मेक इन इंडिया या उपक्रमाचे कौतुक करत फ्रान्सने विविध क्षेत्रांत त्यात सहभाग घेतल्याचे सांगितले. त्यांनी भारताचे वर्णन नवोन्मेषाचा देश असे करत कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत भारत-फ्रान्स सहकार्य अधिक विस्तारण्याची गरज व्यक्त केली. तसेच नागरी अणुऊर्जा क्षेत्रात, विशेषत: लघु मॉड्युलर अणुभट्टया या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत इनोव्हेट्स २०२६ म्हणजे काय?
भारत सरकारचा प्रमुख जागतिक नवोन्मेष उपक्रम, डीप-टेक स्टार्टअप्स आणि संशोधन प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ, भारत, फ्रान्स आणि इतर देशांतील स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांचा सहभाग.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news