27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाभारताने मालिका 4-1 ने जिंकली

भारताने मालिका 4-1 ने जिंकली

बंगळुरू : भारताने रोमहर्षक टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या अर्शदीप सिंगने बेंगळुरूमध्ये शेवटच्या 6 चेंडूत 10 धावा केल्या. पहिल्या 3 चेंडूंवर त्याने एकही धाव दिली नाही आणि कर्णधार मॅथ्यू वेडची विकेटही घेतली. अखेरच्या षटकात संघाला केवळ 3 धावा करता आल्या.

भारताकडून मुकेश कुमारने 3 बळी घेतले. तर अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोईने 2-2 विकेट घेतल्या. श्रेयस अय्यरने 53 धावा केल्या. 5व्या ळ20 मधील विजयासह टीम इंडियाने 4-1 च्या फरकाने मालिका जिंकली.

भारतीय संघ हेड टू हेड रेकॉर्डमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने 18 सामने जिंकले आहेत, तर 11 सामन्यांचे निकाल कांगारूंच्या बाजूने लागले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

मैदानावर हेड टू हेडमध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारतावर वर्चस्व गाजवत आहे. संघाने आपले दोन्ही ळ-20 येथे जिंकले आहेत. तर भारतीय संघाने या मैदानावर 6 पैकी 3 टी-20 सामने गमावले आहेत. भारतातील हे एकमेव होम ग्राऊंड आहे, जिथे भारतीय संघाने 3 टी-20 सामने गमावले आहेत आणि 2 जिंकले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR