ब्रिटनकडून भारतीय कॅप्टनला अटक

लंडन : जहाजावरून बेकायदेशीर रशियन तेल वाहून नेल्याप्रकरणी ब्रिटनने भारतीय कॅप्टनला अटक केली आहे. अजय पंत असे अटक केलेल्या कॅप्टनचे नाव आहे. रशियावर लादलेल्या पाश्चात्य निर्बंधांच्या उल्लंघनाशी संबंधित ब्रिटनकडून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या भारतीय कॅप्टनवर रशियातून दुस-या देशात प्रतिबंधित तेल आणि तेल उत्पादने वाहून नेण्यात भूमिका बजावल्याचा आरोप आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी एक संयुक्त कारवाईदरम्यान पंत यांच्यावर कारवाई झाल्याचे सोमवारी ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने जाहीर केले. पंत यांच्यावर रशियाशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या कारवाईत, एनसीए आणि ब्रिटिश सशस्त्र दलांनी इंग्लिश सामुद्रधुनीत रशियन शॅडो फ्लीट तेल टँकर अडवला. एनसीएनुसार, अजय पंत यांच्यावर रशियातून तिस-या देशात, कथितरित्या जहाजाद्वारे प्रतिबंधित तेल किंवा तेल उत्पादने वाहून नेल्याचा आरोप आहे. अजय पंत यांना मंगळवारी साउथहॅम्प्टन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात येणर आहे.

एनसीएच्या तपास अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने पंत यांच्यावरील आरोपांना मंजुरी दिली. जहाजावरील उर्वरित २४ कर्मचारी हे भारतीय आणि जॉर्जियाचे नागरिक असून ते जहाजावरच आहेत. सुमारे सहा तास चाललेल्या या लष्करी मोहिमेत चिनूक, मर्लिन एमके४, वाइल्डकॅट हेलिकॉप्टर, रॉयल एअर फोर्सची पी-८ विमाने आणि एचएमएस सदरलँड व एचएमएस लेडबरी यांसारख्या युद्धनौकांचा समावेश होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news