नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर केएल राहुल आणि सूर्य कुमार यादव वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करतील.
कसोटीसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा
टी-२० संघ
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
एकदिवसीय संघ
रुतुराज गायकवाड, एसएआय सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.