28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयवैभव गेहलोत यांची चौकशी

वैभव गेहलोत यांची चौकशी

मनी लाँड्रिंग प्रकरण करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची धूमाकूळ सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.

वैभव गहलोत यांची फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट) उल्लंघन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली. दिल्लीत ईडीसमोर हजर झाल्यानंतर वैभव गेहलोत म्हणाले की, फेमा प्रकरणात ईडीने मला प्रश्न विचारले आणि मी सांगितले की, आमचा फेमाशी काहीही संबंध नाही. वैभव गेहलोत म्हणाले की माझा आणि माझ्या कुटुंबाचा फेमाशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणताही परदेशी व्यवहार केला नाही. दरम्यान, राजस्थानमधील पेपर लीक प्रकरणी नुकतेच ईडीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरावर छापा टाकला होता. यासोबतच ईडीने फेमा प्रकरणी वैभव गेहलोत यांना समन्स बजावले होते. वैभव गहलोत यांच्या कंपनीवर शेल कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपये मॉरिशसला पाठविल्याचा आरोप आहे. याबाबत भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती.

वैभव गेहलोत यांनी मॉरिशसच्या एका कंपनीच्या माध्यमातून हॉटेलमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप किरोडीलाल मीणा यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढविला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व भाजप करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना चुकीचे दाखविण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR