‘बाजारात हिट तयार आहे, इलाज केला जाईल’; कॉकरोच जनता पार्टीच्या वादावर कुमार विश्वास यांचा खोचक टोला

डेहराडून: भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान तरुणांविषयी केलेल्या ‘कॉकरोच’ (झुरळ) आणि ‘परजीवी’ या टिप्पणीवरून सध्या देशभरात नवा वाद पेटला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर अचानक ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) नावाचे एक व्यंग्यात्मक डिजिटल आंदोलन उभे राहिले असून, त्याला कोट्यवधी तरुणांचा पाठिंबा मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता प्रसिद्ध कवी आणि प्रखरे वक्ते डॉ. कुमार विश्वास यांनी अत्यंत खोचक शब्दांत तंज कसला आहे. “जर देशात कॉकरोच तयार झाले असतील, तर बाजारात ‘हिट’ (HIT – झुरळ मारण्याचे औषध) देखील उपलब्ध आहे, या कॉकरोचचा इलाज केला जाईल,” असे विवादित वक्तव्य कुमार विश्वास यांनी केले आहे.

उत्तराखंडमधील डेहराडून येथे आयोजित ‘लेखक गाव’ (Writer’s Village) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुमार विश्वास आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत या डिजिटल चळवळीवर आणि त्याशी जोडल्या गेलेल्या तरुणांवर कडाडून टीका केली.

कुमार विश्वास म्हणाले की, लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की कॉकरोच हा एक कीटक असून तो केवळ घाणीत आणि सडलेल्या ठिकाणीच पैदा होतो. हा एक टाकाऊ जीव आहे. मला कॉकरोचबद्दल पहिल्यांदा तेव्हा समजले जेव्हा मी मोठा झालो आणि माझ्या आईने सांगितले की, हे जीव नेहमी अंधारात राहतात आणि एकत्र गोळा होतात. कॉकरोच कोणत्याही चांगल्या आणि सुशोभित वस्तूवर आक्रमण करतात आणि आधीपासून तयार असलेल्या चांगल्या व्यवस्थांचा नाश करण्याचे काम करतात. पुढे बोलताना त्यांनी थेट इशारा देत म्हटले की, जर देशात अशा कॉकरोचची निर्मिती झाली असेल, तर त्यांचा नायनाट करण्यासाठी ‘हिट’ देखील सज्ज आहे. मग ते बंगाल असो की पंजाब, अशा कॉकरोचचा इलाज वेळेवर केला जाईल.

डॉ. कुमार विश्वास यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून तरुणांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नेत्यांनी आणि बेरोजगार तरुणांनी कुमार विश्वास यांच्या या वक्तव्याला देशातील सुशिक्षित तरुणांचा घोर अपमान म्हटले आहे. “आम्ही हक्काचा रोजगार आणि पेपर लीक विरोधात आवाज उठवला तर आम्हाला किडा-मुंगी समजून मारण्याची भाषा केली जात आहे का?” असा सवाल आता सोशल मीडियावरून विचारला जात आहे.

हा सगळा वाद गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर सुरू झाला होता. राष्ट्रीय पातळीवरील NEET परीक्षा आणि इतर सरकारी परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांमुळे तरुण आधीच संतप्त असताना, सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यावरून हिंगोलीच्या अभिजित दिपके या तरुणाने सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन केली, ज्याचे फॉलोअर्स अवघ्या काही दिवसांत थेट २ कोटींच्या पार गेले आहेत. आता या चळवळीला देशातील अनेक विरोधी पक्ष, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली असून, कुमार विश्वास यांच्या या नव्या वक्तव्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news