30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयजॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार

जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार

नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने जाहीर केले की ते अमेरिकेतील हजारो खटले निकाली काढण्यासाठी पुढील २५ वर्षांत ६.५ अब्ज डॉलर देणार आहेत. टॅल्कम बेबी पावडरमुळे कर्करोग होतो असा दावा करणा-या खटल्यांमध्ये कंपनी हे पैसे देणार आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये आरोप करण्यात आला आहे की त्यांच्या टॅल्कम बेबी पावडरमुळे गर्भाशयाचा कर्करोग आणि मेसोथेलियोमा होतो. हे खटले निकाली काढण्यासाठी कंपनीने उपकंपनीची पुनर्रचना करण्यास सांगितले. यावेळी कंपनीच्या प्लॅनमध्ये ३ महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला होता. यावेळी, गर्भाशयाच्या कर्करोगाचे दावेदार या योजनेच्या बाजूने आणि विरोधात मतदान करू शकतात. ७५ टक्के दावेदारांनी बाजू घेतल्यास, उपकंपनी दिवाळखोरी दाखल करू शकते.

कंपनीच्या विरोधात असे ६० हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत ज्यात दावा करण्यात आला आहे की, कंपनीने तयार केलेल्या बेबी पावडरच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो. या दावेदारांना पैसे देण्यासाठी कंपनीला तिच्या एका उपकंपनीला दिवाळखोरी जाहीर करायची आहे.

जेणेकरून पीडितांशी न्यायालयाबाहेर समझोता करून प्रकरण निकाली काढता येईल. मात्र, त्यांच्या पावडरमध्ये काही दोष असल्याचे कंपनीने अद्याप मान्य केलेले नाही आणि त्यामुळे कर्करोग झाल्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जॉन्सनने या सर्वांविरुद्ध अनेक प्रदीर्घ कायदेशीर लढाया लढल्या आहेत. त्यामुळे जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाच्या मागणीत पूर्वीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने ऑगस्ट २०२३ पर्यंत बेबी पावडरचे उत्पादन पूर्णपणे थांबवणार असल्याचे सांगितले होते.
गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यूएस ड्रग कंट्रोल एजन्सीच्या विशेष तपासणीत जॉन्सनच्या बेबी पावडरचा नमुना घेण्यात आला होता. तपासणीअंती त्यात कार्सिनोजेनिक क्रायसोटाईल फायबर आढळून आले. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR