31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रज्योती मेटेंची लोकसभा लढवण्याची घोषणा

ज्योती मेटेंची लोकसभा लढवण्याची घोषणा

थेट पंकजा मुंडेंशी होणार सामना

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासकीय नोकरीचा राजीनामा ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे. तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिका-यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली.

कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसांत ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR