37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर

केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हा जामीन १ जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ४ जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली मात्र, प्रचार ४८ तास अगोदर संपतो असे सांगत १ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काही बोलू शकत नाहीत. पंजाबमध्ये २५ मे तर दिल्लीत १ जूनला मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR