27.3 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रकिशोरी पेडणेकरांची ईडीकडून ६ तास चौकशी

किशोरी पेडणेकरांची ईडीकडून ६ तास चौकशी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर गुरुवारी ईडी चौकशीला सामो-या गेल्या. कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकरांची जवळपास ईडीकडून ६ तास चौकशी झाली. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. पण त्या चौकशीला सामो-या गेल्या नव्हत्या.

त्यानंतर त्या गुरुवारी चौकशीला सामो-या गेल्या. कोरोना काळात डेडबॉडी बॅगच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली. जवळपास ६ तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांची चौकशी केली होती. बिरादार कोरोना काळात खरेदी विभागाचे प्रमुख होते. यापूर्वीच ईडीने कोरोना काळातील कथित अनियमिततेबद्दल बिरादार यांचा जबाब नोंदवला आहे. महापालिकेत कोविड काळात कथित चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप असून त्यांपैकी बॉडी बॅग घोटाळा एक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR