31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमनोज जरांगे आरक्षणाचे हिरो

मनोज जरांगे आरक्षणाचे हिरो

पंकजांनी ट्रोलर्संना सुनावले तस्करी म्हणत बजरंग सोनवणेंवरही निशाणा

बीड : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून बीड जिल्ह्यातही १३ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या बीड लोकसभा मतदारसंघात राजकारण तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून या मुद्दयासंदर्भात भाष्य केले जाते. दरम्यान, पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या नेकनूर येथील सभेत मराठा समाजाला आवाहन करताना नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. गेली ६०-६५ वर्षे हे झोपले होते का, आता आरक्षणच्या मुद्द्याला मुखवटा बनवून राष्ट्रवादीचे लोकं मतं मागत आहेत. गेल्या ५०-६० वर्षे त्यांना कधीच वाटलं नाही, जातीचे बघावे असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लाबोल केला.

काळजावर हात ठेऊन सांगा, मी कधी जातीवाद केलाय का?, असा सवाल पंकजा यांनी उपस्थितांना उद्देशून केला. अहिल्यादेवींनी जसा राज्य कारभार केला, जिजाऊंनी जसे शौर्य दाखवले जसे धैर्य सावित्रीबाई फुलेंनी वापरले. तसेच, शौर्य, धैर्य आणि औदार्य दाखवण्याची गरज आता महिला भगिनींवर आली आहे. माझ्या जिल्ह्याच्या बंधुभावाची, माझ्या जिल्ह्याच्या सुंदर सलोख्याची तस्करी करण्याचे प्रयत्न हाणून पाडा, असे म्हणत पंकजा यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला.

पंकजा मुंडेंनी ट्रोलर्संनाही सुनावले, कुणी ट्रोल केले, फेसबुकवर आपल्यावर कमेंट केली तर आपल्याला गोळी लागते का?. ट्रोलर्संकडे लक्ष देऊ नका, ती किरायाने आणलेली माणसे असतात. आता आरक्षणच्या मुद्याला मुखवट बनवून राष्ट्रवादीचे लोकं मते मागत आहेत. गेल्या ५०-६० वर्षे त्यांना कधीच वाटले नाही, जातीचं बघावं असे म्हणत पंकजा यांनी नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR