धाराशीव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट व्हावी म्हणून राडा घातला आहे.
धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी भेट द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना चर्चेसाठी आतमध्ये बोलावल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणावरुन राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहाणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे की आरक्षणाची गरज नाही असे विधान राज यांनी केले होते. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत. राज्यामध्ये मराठा-ओबीसी संघर्ष पेटलेले आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावमी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर कराव्यात असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.