29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्र‘मविआ’, महायुतीच्या दावेदारांमध्येच रस्सीखेच!

‘मविआ’, महायुतीच्या दावेदारांमध्येच रस्सीखेच!

पुणे : विनायक कुलकर्णी
पुणे जिल्ह्यातील २१ पैकी ६ विधानसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर करून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली. त्यामध्ये सहा पैकी पांच विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली.

पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांना संधी मिळाली तर भोसरी, दौंड आणि चिंचवड मतदार संघातील उमेदवार जाहीर झाले आहेत केवळ चिंचवडमध्ये उमेदवार बदलण्यात आला. विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या जागेवर शंकर जगताप यांना संधी देण्यात आली. कोथरूडमध्ये उमेदवारी बाबतची स्पर्धा संपली असे समजण्यात येत आहे. पर्वतीचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणा-या आमदार माधुरी मिसाळ यांच्या बरोबरीने माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले आणि राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले भीमाले यांनी लढणार आणि जिंकणार असा नारा दिला आहे.

शिवाजीनगर मतदार संघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे दुस-या वेळेस मतदारांच्या समोर जात आहेत. कोथरूडच्या माजी आमदार आणि विद्यमान खासदार मेधा कुलकर्णी यांना पक्षाने राज्यसभेची संधी दिली त्यामुळे स्पर्धा बहुतांशी प्रमाणात उरली नाही असे मानले जात आहे. चिंचवड मतदार संघात शंकर जगताप, भोसरी मतदार संघात विद्यमान आमदार महेश लांडगे आणि दौंड मतदार संघात आमदार राहुल कुल यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली.

मात्र पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला, वडगाव शेरी, कसबा, हडपसर या मतदार संघातील उमेदवार कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये वरील काही जागांची मागणी तिन्ही पक्षांनी केली असल्याने हा तिढा कसा सोडवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यातही महाविकास आघाडीत काही जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला असल्याने पेच निर्माण झाला आहे. पर्वती मतदार संघात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँंग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांनी दावा केला आहे. अशीच काहीशी स्थिति महायुतीमधील घटक पक्षात आहे. वडगाव शेरी, खडकवासला मतदार संघासाठी दावेदारी करण्यात येत आहे.

कसबा मतदार संघात खुद्द भारतीय जनता पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या मतदार संघातून माजी खासदार स्व. बापट आणि माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी मिळावी या मागणीने जोर धरला आहे त्यामुळे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने पुन्हा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारीत आहेत.

शरद पवार गटाचा भाजपला छुपा पाठिंबा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप शरद पवारांचा पाठिंबा घेत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे. मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाही. राष्ट्रवादीचा छुपा पांिठंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेतेकिंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत, असा गंभीर आरोप सुनील शेळके यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR