२ कोटींचा वैद्यकीय साठा जप्त

मुंबई : भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील तीन आस्थापनांमधून एकूण ८१ लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार या तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियमांचा भंग करणा-या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपास पथकाने मे.साची मेडिक, साकीनाका या आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात परवाने व नोंदणी नसलेल्या व्यावसायिकाने मलेशिया येथून विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हजची आयात करून कोणत्याही परवान्याशिवाय साठवणूक व विक्री केल्याचे उघड झाले. आयात केलेले ग्लोव्हजची वाडा व भिवंडी येथील वैद्यकीय उपकरणे उत्पादन परवाने असलेल्या व्यावसायास पँकिग व लेबलीग करून पुढे त्याची विक्री करण्यास पुरवठा केला असल्याचे आढळून आले. या कारवाईत ७४.८५ रुपये किमतीचे ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ जप्त करण्यात आले. कागदपत्रांनुसार या पेढीने मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना पुरवठा/ विक्री केल्याचे आढळून आले आहे.

कारणे दाखवा नोटिस बजावली
मे.साची मेडिक या संस्थेच्या भिवंडीतील वैद्यकीय उपकरण उत्पादक आस्थापनावर कारवाई करण्यात आली. तथापि तपासणीदरम्यान तेथे ‘वैद्यकीय उपकरणे नियम २०१७’ च्या तरतुदींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. जनस्वास्थाच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने ९.८८ लक्ष रुपयांचा ग्लोव्हजचा साठा प्रतिबंधित केला असून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

शासकीय रूग्णालयांना केला पुरवठा
पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मेडिअर्थ लाईफकेअर आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला, तिथे निर्जंतुकीकरण व इतर उपकरणे नादुरुस्त आहेत, अशा स्थितीत ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ खरेदी करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते निर्जंतुक असल्याचे भासवून शासकिय रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवठा करण्यात आल्याची माहिती आस्थापना मालकाने दिली आहे.

बेकायदेशीर साठवणुक
या मोहिमेत कोटयावधीचे विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज वर निर्जंतुक लेबल करून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना महाविद्यालयांना देखील पुरवठा करण्यात आल्याचा गैरप्रकार गंभीर आहे. प्रशासनाने १.२६ कोटी किमतीचा विना निर्जंतुकीकरण बँडेज, रोल बँडेज व कॉटन गौज साठा विक्री व वितरणासाठी प्रतिबंधित केला आहे. तसेच वैध परवाना नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला अ‍ॅलोपॅथिक औषधांचा ६.१७ लक्ष किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, हस्तगत केलेल्या अभिलेख्याची पडताळणी सुरु आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news