खामेनीच्या अन्त्यसंस्कारासाठी महबूबा मुफ्ती जाणार

तेहरान : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह सैय्यद अली खामेनेई यांच्या शासकीय अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती ३ ते ६ जुलै दरम्यान इराणची राजधानी तेहरानच्या दौ-यावर जाणार आहेत. इराण सरकारने महबूबा मुफ्ती यांना भारताच्या विशेष अतिथी म्हणून अधिकृत निमंत्रण पाठवले आहे.

इराणकडून मिळालेल्या या निमंत्रणावर प्रतिक्रिया देताना महबूबा मुफ्ती म्हणाल्या हे निमंत्रण मिळणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आयुष्यात एकदाच मिळणारी ही एक मोठी संधी आहे. आयतुल्लाह खामेनेई यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी मी नक्कीच तेहरानला जाणार आहे. इराणमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च नेते आयतुल्लाह खामेनेई यांच्या अंतिम संस्कारापूर्वी एक अत्यंत भावूक आणि धक्कादायक दृश्य समोर आले आहे.

तेहरानमधील ग्रँड मोसल्ला परिसर अंत्यविधीसाठी सज्ज करण्यात आला असून तिथे खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील एकूण ५ सदस्यांचे ताबूत एकाच वेळी शेजारी शेजारी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये स्वत: खामेनी, त्यांची मुलगी, सून, नातू आणि जावई यांच्या ताबूतांचा समावेश आहे. या सर्वांवर खामेनी यांच्या मुख्य शासकीय अंत्यसंस्कार कार्यक्रमाचा भाग म्हणूनच एकत्र अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत.

भाजप, काँग्रेससह जैन संतांनाही बुलावा
इराणने भारतासोबतचे संबंध दृढ ठेवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जैन संत आचार्य लोकेश मुनी यांनाही आधीच निमंत्रण पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, भारत सरकारतर्फे अधिकृत शिष्टमंडळ इराणला जाणार असून त्याचे नेतृत्व परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल लेफ्टिनेंट जनरल (निवृत्त) सैयद अता हसनैन करणार आहेत. इराणमध्ये पुढील काही दिवस ही अंत्यसंस्काराची प्रक्रिया चालणार असून या ऐतिहासिक अंत्ययात्रेत सुमारे १.५ ते २ कोटी लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news