अहमदाबाद : विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी फायनल पाहायला मिळेल. मागील ४८ दिवसांपासून दहा संघ आणि कोट्यवधी चाहते याच क्षणाची वाट पाहत होते. विश्वचषकाच्या फायनलकडे गल्ली, दिल्ली ते जगातील सर्व क्रीडा चाहते वाट पाहत आहेत. विश्वचषक विजेत्यावर बक्षीसांचा वर्षाव होतोय. तब्बल १० मिलिअन डॉलरची उधळण होणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम ८२ कोटी ९३ लाख ५५ हजार रुपये इतकी होतेय. म्हणजेच, विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधींची उधळण होणार आहे.
विश्वचषक विजयासाठी दहा संघाने जिवाचे रान केले. पण आठ संघाना आपला गाशा गुंडाळावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी फायनल गाठली. रविवारी, म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी विजेता मिळणार आहे. विजेत्या संघाला तब्बल ३३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या संघाला १६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर सेमीफायनलमध्ये आव्हान संपणा-या दोन्ही संघाला प्रत्येकी सहा-सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये म्हणजेच, साखळी फेरती आव्हान संपलेल्या संघाला प्रत्येकी ८२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. म्हणजेच, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना प्रत्येकी सहा सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. या दोन्ही संघाचे उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले होते.
१९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला संघाला चार मिलिअन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेता संघाला दोन मिलिअन डॉलरवर समाधान मानावे लागेल. विजेता संघ ३३ कोटी तर उपविजेता संघ १६ कोटींचे बक्षीस घेईल. साखळी फेरीमध्ये प्रत्येक विजयाला ३३ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय साखळी फेरीत आव्हान संपणा-या संघाला ८२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.