मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज दुपारी करणार आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचनाला साडेचार वाजता सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष एक ते दीड तास निकालाचे वाचन करणार आहेत. निकालातील ठळक मुद्दे आधी वाचले जाणार आहेत.
अवघ्या काही तासांमध्ये आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, आजचा निकाल हा मुलभूत हक्कासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. यामध्ये कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेतली आहे. निकालामध्ये कायद्याच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य प्रकारे वापर करण्यात येणार आहे. आजपर्यंत काही प्रोव्हिजनचे इंटरपिटीशन झालेले नाही. अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. त्यामुळे या प्रोव्हिजन्सचा वापर केला जाणार आहे.