37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवमोदीजी संकट म्हणून महाराष्ट्रावर आलात

मोदीजी संकट म्हणून महाराष्ट्रावर आलात

धाराशिव : उद्धव ठाकरे यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी काल परवा एक मुलाखत दिली. अनेकांनी मेसेज केले मोदींचे तुमच्यावर प्रेम आहे. मोदीजी तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होते. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. मी खोलात जात नाही. पुरावा कोण कुणाला देणार. हे खरे असेल. तुम्ही माझी अस्थेवाईक विचारपूस करत होता तर खालच्या लोकांना माहीत नव्हते का. पण तुमच्या खालचे माणसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गाठीभेटी घेत होते. तेव्हा तुम्हाला माहीत नाही की हे काय करत होते. एकनाथ खडसे यांचा फोन आला होता. युती तोडण्याचे वरुन आदेश होते. हे तुम्हाला माहित नव्हते का?

‘अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या खोलीत सांगितले होते की, मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षात वाटले जाईल. पण तुम्ही मला खोटे ठरवले. मोदी सरकार नाही हे दंगली सरकार आहे. २०१४ ला काय बोलले हे २०१९ ला आठवत नाही. २०१९ ला काय बोलले हे २०२४ ला आठवत नाही.’ उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी शस्त्रक्रिया झाली असताना कटकारस्थान करत होते. मोदी तुम्हाला माहीत नव्हते. तुमचे चेलेचपाटे काय करतात. तुम्हाला सांगता तुमच्यावर संकट आले तर उद्धव ठाकरे धावून येईल. तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावर आला. तुम्ही आधी स्वतला आवर घाला.

‘मी हिंदुत्व सोडलं. मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तुम्ही म्हणता. मी २०१४ ला तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा संध्याकाळी खडसेंचा फोन आला. युती तोडल्याचे सांगितले. तेव्हा तुम्हाला माहीत नव्हते खाली काय चालले आहे. युती तोडली आहे. ओमराजेंना मत म्हणजे मला मत. प्रज्वल रेवन्ना यांचे अनेक व्हीडीओ आले आहेत. तरीही तुम्ही म्हणता मला मत. बाळासाहेबांचे कर्ज आहे. म्हणता. बाळासाहेब म्हणून नका. नुसतं. ते हिंदूहृदयस्रमाट म्हणा. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ का कचरता. तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता. मग अमित शाह यांनी शब्द का मोडला. मी आईवडिलांची शपथ घेतली आणि तुळजाभवानीची शपथ घेतली आणि सांगितले. मी तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. कर्जमाफी करून दाखवीन. करून दाखवले. कापसाला भाव दिला.’ असे ही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR