पौडी गढवाल : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी निधन झाले.
पौडी गढवालचे पोलिस अधीक्षक (एसएसपी) सर्वेश पनवार यांनी वृत्ताला दुजोरा दिला. पनवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पंचूर गावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शनिवारी हरिद्वार येथे अन्त्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत असे पनवार यांनी सांगितले.
















