बेलिंग्टन : वेलिंग्टनच्या मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. त्यानंतर मात्र त्याने आपला आक्रमक अंदाज दाखवत दमदार अर्धशतक झळकावले. बेसिन रिझर्व्ह मैदानावर त्याने अवघ्या ६६ चेंडूंत हा टप्पा गाठला. वेगवान गोलंदाज जेकब डफीच्या षटकात खणखणीत चौकार मारत त्याने कसोटी कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याची फलंदाजी पाहता तो अर्धशतकाचे शतकात रूपांतर करेल, असे वाटत होते. मात्र, मॅट हेन्रीने त्याची खेळी संपुष्टात आणली. ८५ धावांवर तो झेलबाद होऊन माघारी परतला.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने हळउ च्या २०२५-२७ च्या सायकलमध्ये सर्वाधिक धावा करणा-या भारतीय फलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजाला मागे टाकले. भारताच्या पहिल्या डावातील पाचव्या षटकात जैस्वालने चौकार लगावत संघाचे खाते उघडले. या चौकारासह त्याने हळउ च्या सध्याच्या सायकलमध्ये ८०० धावांचा टप्पा पार केला. जैस्वालचा हा डब्ल्यूटीसीच्या सध्याच्या सायकलमधील १२वा कसोटी सामना आहे. त्याने आतापर्यंत तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.
















