ढाका : बांगलादेशात यापूर्वी देखील राजकीय हिंसाचार झाला असून आता माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंदी घातलेली अवामी लीग पक्षाने लॉकडाऊनच्या आधीत देशभरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण केला आहे. राजधानी ढाकामध्ये अनेक स्फोटांचे आवाज आले असून गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या भागातील युनूस यांच्या ग्रामीण बँकांच्या शाखा पेटवण्यात आल्या आहेत.
यात सिलहट, राजशाही, बारीसाल आणि फरीदपूर या ठिकाणांचा समावेश आहे. चटगांवच्या पांचलाईस भागातील अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला देखील आग लावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान तारिक रहमानच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी च्या कार्यकर्त्यांनी रात्रभर ढाकामधील अवामी लीगच्या दोन नेत्यांच्या घरावर हल्ला केला आणि आग लावली.
अनेक जिल्ह्यात स्फोट, नेत्यांचा मृत्यू
बांगलादेशाच्या ६४ जिल्ह्यातील २८ जिल्ह्यात अनेक बॉम्बस्फोट झाले आहे. अनेक गाड्यांना आग लावण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात ढाकामध्ये जावळपास ४ लोक जखमी झाले आहेत. पश्चिमी नराईल जिल्ह्यात देखील पीएनपीच्या मोर्चावर अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून सत्तारूढ दलाच्या दोन स्थानिक नेत्यांना ठार केले आहे. फरीदपूर आणि पिरोजपूरमध्ये एक बीएनपी नेता आणि एक परिवहन कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे.
हसीना यांच्या परतीवरून हिंसाचार
गेल्या वर्षी ट्रिब्युनलने शेख हसीना यांना मानवतेच्या विरूद्धच्या गुन्हेगार म्हणत त्यांच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. त्याच्या स्मरणार्थ अवामी लीगने लाॉकडाऊनची घोषणा केली. शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेतून बेदखल होऊन भारतात शरण आल्या होत्या.
शेख हसीनांच्या घोषणेनंतर तणाव वाढला
या महिन्याच्या सुरूवातीलाच शेख हसीना यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली असताना देखील डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये परतण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बांगलादेशात तणाव वाढला आहे. मंगळवारी त्यांचे होम टाऊन तुंगीपारामध्ये जवळपास ३० संशयीत समर्थकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शेकडो लोकांनी पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. त्यामुळे पोलिसांना पोलिस ठाणे खाली करावे लागले होते.
















