26.4 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रसोलापूर विभागातील ४ स्थानकांवर मुंबई-नांदेड होळी विशेष गाड्यांना थांबा

सोलापूर विभागातील ४ स्थानकांवर मुंबई-नांदेड होळी विशेष गाड्यांना थांबा

मुंबई : भारतीय रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान ४ होळी विशेष फेऱ्या चालवणार आहे. या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कुर्डूवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद आणि लातूर या ४ स्थानकांवर थांबतील.

गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे-
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – हुजूर साहेब नांदेड विशेष साप्ताहिक (४ फेऱ्या)
– साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01105 दि. १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून मध्यरात्री ००.५५ वाजता सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल.(२ फेऱ्या)

– साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01106 ही हुजूर साहेब नांदेड येथून १२.०३.२०२५ आणि १९.०३.२०२५ (बुधवार) रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल.(२ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा

संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सेकंड सीटिंग, १ पॅन्ट्री, १ जनरेटर व्हॅन आणि १ सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण २२ डबे

आरक्षण: 01105/01106 या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या वेबसाइटवर खुले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR