35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूर५० हजारांची लाच घेताना पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील नाईक चर्तुभुज

५० हजारांची लाच घेताना पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील नाईक चर्तुभुज

सोलापूर : अपघात प्रकरणात वाहन जप्त न करणे व आरोपी न करण्यासाठी एक लाखाची मागणी करून ५० हजाराची लाच घेताना पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील नाईक. वैजिनाथ संदिपान कुंभार (वय ५२ वर्षे, पद पोलीस नाईक, म.नं. ३८०, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण रा. अर्थव बिल्डींग, ब्लॉक नं. २०७, पुजारी सिटी, इसबावी पंढरपूर ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथेभ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे आरोपीचे नांव व कार्यालयआलोसे वैजिनाथ संदिपान (वय ५२ वर्षे, पद पोलीस नाईक, ब.नं. ३८०, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण रा. अर्थव बिल्डींग, ब्लॉक नं. २०७, पुजारी सिटी, इसबावी पंढरपूर ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी हाकिकत अशी की पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गु.र.नं. ४४/२०२४, भा. द.वि. संहिता १८६० चे कलम २७९. ३३७, ३३८ व मोटार वाहन अधिनिय १९८८ चे कलम १३४ (ए), १३४ (बी) १७७, १८४ प्रमाणे अज्ञात वाहनाविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार यांची मोटार सायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासठी यातील लोकसेवक वैजिनाथ संदिपान कुंभार, यांनी तक्रारदार यांचेकडे १,००,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंति ५०,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करुन सदरची लाच रक्कम स्यता स्विकारले वरून रंगेहात पकडण्यात आली आहे.

अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोहेकों अतुल घाडगे, पोहेकों सलीम मुल्ला, पोना स्वामीराव जाधव, चापीकों शाम सुरवसे यांनी ही कारवाई केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR