22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयनितीश कुमारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचे नवे सरकार स्थापन

पाटना : बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर अखेर भाजपने सत्ता मिळवली. भाजपच्या साथीने नितीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. रविवार २८ जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडी सोबतच्या सरकारमधून त्यांचा पांिठबा काढून घेतला. दरम्यान भाजपच्या पांिठब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केले आहे. नितीश कुमार यांच्यसह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्ता पालटली असून राज्य सरकारची समिकरणे पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान यामध्ये भाजपचे काही नेते देखील मंत्रीमंडळात सामील होतील. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच काम राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR