युरोपात घुसखोरांना नो एंट्री

माद्रिद/लंडन : स्पेनमधील सेउता येथे निर्माण झालेल्या घुसखोरीच्या संकटामुळे युरोपचे राजकारण तापले आहे. युरोपियन युनियनमधील (ईयू) २७ पैकी २२ देशांनी बॉर्डर प्लॅन बदलण्याची आणि सीमेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये इटली, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या देशांचा समावेश आहे. मंगळवारी २७ देशांचे गृहमंत्री घुसखोरांच्या नो एंट्री प्लॅनवर चर्चा करतील. हा प्लॅन ६ स्तरांवर तयार केला जाऊ शकतो. स्पेनसह ५ देशांनी २२ देशांच्या या प्लॅनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्पेनमधील मूलगामी विचारसरणीचे पक्ष याला परदेशी आक्रमण म्हणत आहेत. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनमध्ये हकालपट्टीची मागणी तीव्र झाली. फ्रंटेक्सनुसार २००९ ते २०२५ दरम्यान (१७ वर्षे) चार सागरी मार्गांवर ३५.२५ लाख बेकायदेशीर प्रवाशांच्या एंट्रीची नोंद झाली. पूर्व भूमध्यसागरीय मार्ग, मुख्यत्वे ग्रीस आणि सायप्रसच्या दिशेने, १७.८१ लाख. लीबिया-ट्युनिशियातून इटली आणि माल्टा पोहोचणा-या मध्य भूमध्यसागरीय मार्गावर १३.०३ लाख. मोरोक्को-अल्जेरियातून स्पेनला जाणा-या पश्चिम भूमध्यसागरीय मार्गावर २.६५ लाख आणि अटलांटिक-कॅनरी मार्गावर १.७६ लाख एंट्री झाली.

आफ्रिकन घुसखोरीत टॉप, दक्षिण आशिया दुसरा
युरोपियन युनियनमध्ये २०२५ दरम्यान ७.१९ लाख नागरिक बेकायदेशीरपणे आढळले. यात अल्जारियाचे ७१,०१५ नागरिक असून ते टॉपवर आहेत. दुस-या स्थानावर द. आशियाई देश अफगाणिस्तानचे ४२,७५० व तिस-या स्थानावर मोरोक्कोचे ३९,०५० नागरिक आहेत. टॉप तीनपैकी दोन आफ्रिकन देश आहेत. अल्जारिया व मोरोक्को एकूण घुसखोरीच्या १५% आहेत.

घुसखोरीने युरोपमधील उजव्या पक्षांना सत्तेच्या जवळ पोहोचवले
इटली : मेलोनी जलद हकालपट्टी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचे नागरिकत्व काढून घेण्यासारखी पावले उचलत आहेत.
ब्रिटन : मूलगामी नेते नाइजेल फराज यांनी हकालपट्टीला सर्वात मोठे हत्यार बनवले.
जर्मनी : एएफडी १५० जागांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सीमा तपासणी आणि जलद हकालपट्टीचे धोरण त्यांनी स्वीकारले.
फ्रान्स : नॅशनल रॅली १२३ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. २०२७ च्या सत्तेचा हा प्रबळ दावेदार मानला जातो. पक्षाने सीमा तपासणी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्पेनने ६० हजार स्थलांतरितांना परत पाठवले
सेउतो स्पेनच्या उत्तर आफ्रिकी भाग असलेल्या सेउतामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी जमा झालेल्या ६० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरितांपैकी बहुतांश जण मोरोक्कोमध्ये परत गेले किंवा त्यांना परत पाठवण्यात आले. सीमा उघडल्याच्या अफवेनंतर लोकांनी पोहून, कुंपण ओलांडून आणि सागरी मार्गाने शहरात प्रवेश केला होता. परंतु सेउतामध्ये पोहोचल्यानंतर मुख्य स्पेनमध्ये जाण्याचा मार्ग त्यांना मिळाला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news