संविधानापेक्षा कोणी मोठे नाही, भावना भडकवू नका

मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले असताना भाजपने सार्वजनिक ठिकाणी होणा-या कुर्बानीला कडाडून विरोध सुरू केला आहे. मीरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बक-यांवरून गेल्या काही दिवसांत वाद निर्माण झाला आहे.

पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी भारतीय संविधानाचा उल्लेख करत सर्व धर्मांना समान अधिकार असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही कृती संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नये. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाबाबत बोलताना, मुस्लिम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलेच लोक आहेत. भारतात पूर्वी सर्वजण हिंदू होते. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणारे वातावरण तयार होऊ देऊ नये, असे विधान केले. भाजपसह कोणत्याही पक्षाने समाजात द्वेष पसरवणारी भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. रामदास आठवले यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बकरी ईदच्या कुर्बानीविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत असताना, आठवलेंनी दिलेला हा सल्ला भाजपसाठी घरचा आहेर मानला जात आहे. भारतीय संविधान सर्वांसाठी समान आहे. धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असेही आठवले यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील वाढत्या धार्मिक वादांच्या पार्श्वभूमीवर आठवलेंच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. मनोज शिरूरे अटकेत;CBI ची मोठी कारवाई
03:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. शिरूरेनं मोटेगावकरला पेपर विकला?;मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
03:01
Video thumbnail
Latur|तोंडार पाटीजवळ दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग;अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
01:19
Video thumbnail
इंडिगो पायलटच्या कॅमेऱ्यात कैद भारत-पाक सीमेचे विलोभनीय रूप, रात्रीच्या झगमगाटाचा व्हिडिओ व्हायरल!
00:33
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42
Video thumbnail
Nanded|नांदेड विभागात एसटीचा महिन्याला 50 लाखांचा वाढीव भार;तोट्यातील एसटीवर इंधन दरवाढीचे संकट
02:57

Latest news