33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

पुणे : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापत असतानाच उमेदवारांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिका-यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळली आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस जारी केली आहे. त्या संदर्भात ४८ तासांत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी काल बुधवारी झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी खर्च सादर केला. त्यात राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा २८ एप्रिलपर्यंतचा ३७ लाख २३ हजार ६१० रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. मात्र, उमेदवारांच्या खर्च प्रतिनिधीने दाखविलेल्या खर्चाशी निवडणूक अधिका-यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केली. त्यावेळी त्यात १ लाख तीन हजार ४४९ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण अधिका-यांनी नोंदविले. उमेदवाराने दिलेला खर्च खरा आणि योग्य वाटत नसल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने ही तफावत अमान्य केली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR