23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्र३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार

३ ऑक्टोबर ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा होणार

मंत्रिमंडळाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत होत आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही या निर्णयाचा आनंद व्यक्त केला. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिली आहे.

आता यापुढे ३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने अत्यानंद व्यक्त केला. जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव करण्यात आला असे या पोस्टमध्ये म्हटले आहेत.
३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला असेही यात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR