28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआयईडी स्फोटात एक सीआरपीएफ जवान शहीद; दोन जण गंभीर जखमी

आयईडी स्फोटात एक सीआरपीएफ जवान शहीद; दोन जण गंभीर जखमी

रांची : झारखंडमधील चाईबासा येथे शुक्रवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला असून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी जवानांना पुढील उपचारासाठी विमानाने रांचीला हलवण्यात आले आहे. वृतसंस्थेने ही माहिती दिली आहे. सुरक्षा दलाचे जवान शुक्रवारी मोहिमेवर होते, त्यावेळी हा स्फोट झाला. संतोष ओराव असे शहीद जवानाचे नाव आहे. ते सीआरपीएफच्या ९४ बटालियनचे शिपाई होते. जखमींमध्ये सीआरपीएफच्या ६० व्या बटालियनचे इजेटो टिने आणि कॉन्स्टेबल जयंता नाथ यांचा समावेश आहे. दोघेही ईशान्य भागातील रहिवासी आहेत.

सीआरपीएफचे पथक चाईबासा येथील हाथीबुरू जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहिमेवर गेले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी जमिनीखाली पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. बटालियनमधील तीन जणांना त्याचा फटका बसला. गंभीर जखमी कॉन्स्टेबल संतोष ओराव यांचा उपचारासाठी आणत असताना त्यांचा मृत्यू झाला.

चाईबासाचे एसपी आशुतोष शेखर यांनी सांगितले की, नक्षलवादी मोहिमेवर असलेल्या सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी दुपारी आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला. चाईबासामध्ये नक्षलवाद्यांनी गेल्या ऑगस्टपासून किमान ६ वेळा आयईडी स्फोटांद्वारे सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. मागील काही काळात पोलीस आणि सुरक्षा दलांचे चार अधिकारी आणि जवान शहीद झाले आहेत. सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी जंगलात आयईडी पेरतात, पण अनेक वेळा सामान्य लोकही त्याला बळी पडतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR