39.1 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीय२ कॅप्टनसह ४ जवान शहीद

२ कॅप्टनसह ४ जवान शहीद

जम्मू-काश्मिरात धुमश्चक्री, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

राजौरी : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कालाकोट भागात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत २ कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजूनही या भागात धुमश्चक्री सुरूच आहे. या भागात भारतीय लष्करी जवानांनी घेराव घातला असून, शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

या चकमकीत जे अधिकारी शहीद झाले, ते कॅप्टन रँकचे आहेत. सुरुवातीला या चकमकीत एक लष्करी जवान ठार झाल्याचे आणि तीन जवान गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त होतं. दरम्यान, या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या भागात धुमश्चक्री सुरू असतानाच राजौरी-पूंछचे डीआयजी राहे हसिब मुघल यांनी सांगितले की, या भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती आमच्याकडे आली होती. त्यामुळे या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी स्थानिक पोलिस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफचे जवान यांनी संयुक्त शोध मोहीम सुरु केली होती. त्यावेळी धुमश्चक्री सुरू झाली.

यावेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात दोन कॅप्टन रँकच्या अधिका-यांना गोळ््या लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. अजूनही या भागात गोळीबार सुरू असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिक्स स्वरुपाची सुरक्षा रक्षकांची कुमक मागवण्यात आली आहे.

राजौरी, पूंछ भागात पुन्हा शांतता भंग
राजौरी आणि पूंछ भाग काही काळापूर्वी शांत राहिला होता. पण आता पुन्हा एकदा या भागात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी डोके वर काढल्े आहे. त्यांच्याकडून सातत्याने जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग केली जात आहे. गेल्याच आठवड्यात या भागात ८ दहशतवादी मारले गेले होते. उरी, कुलगाम आणि राजौरीतील बुधाल भागात या चकमकी झाल्या होत्या.

अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न
राजौरी जिल्ह्यातील बाजीमल जंगलाचा फायदा उठवत अतिरेकी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करतात. या भागात घनदाट जंगल आहे. या भागात अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळताच लष्करी जवानांनी घेराव घालून कारवाई सुरू केली. त्यामुळे घुसखोरी रोखण्यात यश आले. मात्र, या चकमकीत चार भारतीय जवानांना गमवावे लागले. पीर पंजाल जंगल जवानांसाठी नेहमीच आव्हान ठरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR