37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रगोल्डी ब्रार जिवंतच!

गोल्डी ब्रार जिवंतच!

मुंबई : प्रतिनिधी
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड इंडो-कँडियन गँगस्टर गोल्डी ब्रार जिवंत असल्याचे अमेरिकन पोलिसांनी सांगितले. गोल्डी ब्रार याची कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात हत्या झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, गोल्डी ब्रार जिवंत आहे, असे सांगण्यात येत आहे. अमेरिकन पोलिसी अधिकारी टोनी बोटी यांनी ही माहिती दिली.

गोल्डी ब्रार याच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत. गोळीबारात मृत्यू झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव झेवियर ग्लॅडनी असे आहे. दरम्यान, गँगस्टर गोल्डी ब्रार जिवंत असल्याचे फ्रेस्नो पोलिसांनी सांगितले आहे. फेअरमाँट आणि होल्ट अ‍ॅव्हेन्यू येथील गल्लीमध्ये परस्पर वादातून गोळीबार झाला. यामध्ये ठार झालेल्या व्यक्तीची ओळख ३७ वर्षीय झेवियर ग्लॅडनी अशी आहे. ३३ वर्षीय डॅरेन विल्यम्स असे हल्लेखोराचे नाव आहे. या घटनेचा भारतातील प्रतिष्ठित टोळीचा समावेश असलेल्या कोणत्याही हत्या प्रकरणाशी संबंध नाही.

गोल्डी ब्रार मुसेवालाच्या हत्याकाडांतील आरोपी
गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडाला गेला पण तिथल्या गुन्हेगारीच्या जगाच्या संपर्कात आला. बुधवारी त्यांची अमेरिकेत गोळ््या झाडून हत्या झाल्याची बातमी समोर आली. आता अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR